26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरविरोधकांचा ५ वर्षांत ५ पंतप्रधानांचा फॉर्म्युला

विरोधकांचा ५ वर्षांत ५ पंतप्रधानांचा फॉर्म्युला

सोलापूर : प्रतिनिधी
सत्ता मिळवण्यासाठी इंडिया आघाडीने आता नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. दरवर्षी नवीन पंतप्रधान, ५ वर्षात पाच पंतप्रधान आणायची यांची रणनीती आहे. दरवर्षी नवीन पंतप्रधान येणार आणि देशाला लुटणार.नकली शिवसेनेचा एक बोलघेवढा नेता एका वर्षात चार पंतप्रधान केले तर काय बिघडते, असे म्हणतो. मग असा कसा देश चालवतील तुम्हीच सांगा. त्यांना देश चालवायचा नाही तर मलाई खायची आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी ते सोलापुरात आले होते, त्यावेळी आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. मी २०२४ मध्ये दुस-यांदा सोलापुरात येत आहे. हे सोलापूरकरांचे प्रेम आहे. मी जानेवारीत आलो तेव्हा काही घेऊन आलो होतो, आता मात्र तुमच्याकडे काही मागायला आलो आहे. काँग्रेसने देशाला भ्रष्टाचारमध्ये ढकलेले होते. तुम्ही दहा वर्षाच्या मोदींच्या कार्याला पाहिलेले आहे. इंडी आघाडीत नेत्याच्या नावावर युद्ध सुरु आहे. इतक्या मोठ्या देशात ज्याचे नाव, ज्याचा चेहरा अजून फिक्स नाही, त्यांच्या हातात कोण सत्ता देईल का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

संविधान बदलणार नाही
जेव्हा देशात कॉंग्रेसविरोधी सरकार सत्तेवर आले, तेव्हा दलितच्या मुलाला राष्ट्रपती बनवले, आदिवासी मुलीला पहिल्यांदा राष्ट्रपती बनवले. एससी, एसटी सर्वांत जास्त नेते भाजपमधून निवडून येतात. कॉंग्रेस संविधान बदलण्यासंबंधीचा खोटा प्रचार करीत आहे. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवणार नाहीत, मोदी तर दूरची गोष्ट आहे, असे मोदी म्हणाले.

पवारांचे नाव न घेता पुण्यात अतृप्त आत्म्याचा उल्लेख
महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्याने ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटले. त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचे काम या व्यक्तीकडून केले जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात आयोजित सभेत त्यांनी टीका केली. त्यावर राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार काय आहेत, ते मैदानात दाखवून देतील, असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मोदींची आज साता-यातही सभा झाली तर मंगळवारी लातूर, धाराशिव, माढ्यात सभा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR