नवी दिल्ली : शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदाराने लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतले. पण यामुळे शपथ घेण्याच्या पद्धतीत बदल केल्याने त्यांना प्रोटेम अध्यक्षांनी पुन्हा शपथ घ्यायला सांगितले. त्यानंतर बाळासाहेबांचे नाव वगळून या खासदारांनी पुन्हा शपथ घेतली.
ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. पण यामध्ये त्यांनी एक चूक केली, ती म्हणजे शपथ घेताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. पण शपथ घेताना अशा प्रकारे कोणालाही स्मरून शपथ घेणे हे नियमात बसत नसल्याने त्यांना प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांनी आष्टीकर यांना पुन्हा शपथ घ्यायला सांगितले.
यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा शपथ घेताना त्यातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेणे वगळले आणि त्यांचा शपथविधी पूर्ण झाला. पण या प्रकारामुळे आष्टीकर काही काळ चर्चेत आले. याच शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनीही शपथ घेतली.