19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयएकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करणारच

एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करणारच

रायपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. जालना, बीड, धाराशीव, लातूर, नंदूरबार, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले. जाळपोळीच्या घटनांनंतर अनेक नेत्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा भडका उडालेला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड येथे प्रचारात व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत.

छत्तीसगड येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. प्रचाराला वेग येत आहे. भाजपचे अनेक नेते, मंत्री छत्तीसगडमध्ये जात आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांनी छत्तीसगडमधील रायपूर शहर येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला, चर्चा केली. छत्तीसगड येथे मीडियाशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

विरोधकांकडून टीकेची झोड
देवेंद्र फडणवीस छत्तीसगड येथे प्रचाराला गेल्याबाबत विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे. याकाळात राज्याच्या गृहमंर्त्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे. परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वा-यावर सोडणा-या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR