24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रएल्विश यादवचे 'वर्षा'वर आदरातिथ्य!

एल्विश यादवचे ‘वर्षा’वर आदरातिथ्य!

मुंबई : रेव्ह पार्ट्यांचे आयोजन आणि तस्करीचा आरोप असलेला ‘ बिगबॉस’ फेम एल्विश यादवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती पूजनानिमित्त एल्विशला वर्षा बंगल्यावर बोलवून त्याचे आदरतिथ्य केल्याची समोर आल्याने विरोधकांनी मुख्यमंर्त्यांना घेरले आहे. मुख्यमंर्त्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

बिग बॉस’ मुळे प्रकाशझोतात आलेला एल्विश यादववर अवैधरित्या रेव्ह पार्ट्यांचे आयोजन आणि तस्करी केल्याचा आरोप आहे. सापाच्या विषापासून ड्रग्स बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी एल्विश यादवच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आल्याची एक चित्रफीत कालपासून समाजमाध्यामातून फिरत होती. यावरून विरोधकांनी आज मुख्यमंर्त्यांना धारेवर धरले.

महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्सचे सेवन विक्री करणा-या एल्विश यादवसारख्या लोकांचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादवसारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का ? असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला आहे. आधीच राज्यात ड्रगचे कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो आहे. त्यानंतर त्याला पळवून लावले जाते आणि इथे वर्षावर तर नशाबाज आरती करतो हे आहे महायुती सरकार अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR