कोलकाता : पाकिस्तान संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. इंग्लंडविरुद्धच्या आज अखेरच्या साखळी सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पुन्हा माती खाल्ली… हॅरीस रौफच्या धुलाईचे सत्र याही सामन्यात कायम राहिले. बेन स्टोक्स व जो रूट यांच्या वैयक्तित अर्धशतकाने पाकिस्तानचा चांगला चोप दिला. इंग्लंडकडून वन डे वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात १००० धावा करणारा रूट पहिला फलंदाज ठरला.
बाबर आजमच्या सकारात्मकतेच्या पाकिस्तानी गोलंदाजांनीचिंधड्या उडवल्या. डेवीड मलान व जॉनी बेअरस्टो यांनी ८२ धावांची भागीदारी केली. मलान ३१ धावांवर बाद झाला. एकाच वर्ल्ड कपमध्ये ५०० हून अधिक धावा देणारा तो आशियातील पहिला गोलंदाज ठरला. बेअरस्टोने अर्धशतक पूर्ण केले. बेअरस्टोने ६१ चेंडूंत ५९ धावा केल्या. रौफला त्याची विकेट मिळविण्यात यश आले. जो रूट व बेन स्टोक्स यांनी तिस-या विकेटसाठी १३१ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. मागील सामन्यातील शतकवीर स्टोक्सने आज ७६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ८४ धावा चोपल्या. शाहीन आफ्रिदीने त्याचा त्रिफळा उडवला.
जो रूटही ७२ चेंडूंत ६० धावांवर शाहीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात १००० धावा करणारा जो रूट हा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. ग्रॅहम गूच ( ८९७) व बेन स्टोक्स ( ७६५) यांनी त्यानंतर इंग्लंडसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट्स घेणा-या गोलंदाजांत शाहीन ( ३४) संयुक्तपणे ( इम्रान खान ) तिस-या क्रमांकावर आला. वसीम अक्रम ( ५५) व वाहब रियाझ ( ३५) हे आघाडीवर आहेत. जॉस बटलर आणि हॅरी ब्रुक यांनी २६ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी केली. ब्रुकने १७ चेंडूंत ३० धावा कुटल्या. बटलर १७ चेंडूंत २७ धावांवर रन आऊट झाला. इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३७ धावा केल्या.