25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रसदावर्तेंची राजकीय खेळी : सुषमा अंधारे

सदावर्तेंची राजकीय खेळी : सुषमा अंधारे

मुंबई : सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांया नेतृत्त्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने ऐन दिवाळीत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसंच, त्यांनी मराठा आरक्षणाविरोधातही षड्डू ठोकला आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी हल्लाबोल केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘‘सदावर्तेंना लोक स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. परंतु, सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर खेळी करत आहेत, ही एक राजकीय खेळी आहे’अशी टीका सुषमा अंधारे यांनी केल्या.

दरम्यान, ‘संबंध महाराष्ट्रात मराठा आरक्षणादरम्यान गुणरत्न सदावर्ते हे फडणवीसांचा माणूस, फडणवीसांचा बोलका बाहुला आहे, असं वातावरण तयार झाले. मी फडणवीसांचा माणूस नाही किंवा फडणवीसांशी तसा अर्था अर्थी संबंध नाही, हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न म्हणून सदावर्ते फडवीस सरकारमध्ये असताना आंदोलन करत आहेत. परंतु, लोक अशा भ्रामकतेला फसणार नाहीत, हेही तितकेच खरे’, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. म्हणजे, गुणरत्न सदावर्ते यांनी पुकारलेला संप ही राजकीय खेळी असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विमानतळावर भेट घेतली. याबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘सत्तेतील घटकपक्ष आहेत, राज्यातील सत्तेत ते एकत्र आहेत. त्यामुळे सत्तेतील घटकपक्षानी एकमेकांशी काय बोलावे, काय नाही बोलावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहेत. परंतु, दादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा असू शकते. कारण, दादा गटाची जवळीक भाजपाशी निश्चितपणे जास्त वाढली आहे.’’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR