22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयबजेटमधूनही मालदीवला दणका! लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना

बजेटमधूनही मालदीवला दणका! लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या की, लक्षद्वीपमध्ये नवीन प्रकल्प सुरू होतील. तसेच, पर्यटन क्षेत्राच्या विकासाला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौ-यानंतर या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

आपण विशिष्ट क्षेत्रांबद्दल बोलतो प्रवास आणि पर्यटन क्षेत्र हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. लक्षद्वीपमधील पर्यटन विषयक पायाभूत विकासावर भर दिला जाईल. नवीन कॉटेज हाऊस, रिसॉर्ट्स, गेस्ट हाऊस आणि हॉटेल्स बांधण्यासाठी प्रोत्साहन देणे शक्य आहे. तसेच ज्याप्रमाणे मालदीवमध्ये विमानतळावरून बेटावर जाण्यासाठी जेटी उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे लक्षद्वीपमध्येही पायाभूत सुविधा तयार केल्या जातील.

पंतप्रधान मोदींचा दौरा आणि त्यानंतर मालदीवशी झालेल्या वादानंतर लक्षद्वीपचा मालदीवसारखा विकास करण्यासाठी रूपरेषा तयार केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौ-यात ११५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR