16.5 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रमुदत संपलेल्या रुग्णवाहिका कायम

मुदत संपलेल्या रुग्णवाहिका कायम

शिंदे- फडणवीस सरकारचा अजब निर्णय

मुंबई : राज्यभरात रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात येणा-या ‘१०८’च्या सेवेला तिस-यांदा मुदतवाढ देण्याचा अजब निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच या मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या रुग्णवाहिकांचे आयुष्य संपलेले असतानाच व त्याबाबतचा अहवालही आयुक्तालयातर्फे देण्यात आल्यानंतरदेखील ही मुदतवाढ देण्यात येत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्य म्हणजे, ही रुग्णवाहिका सेवेचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारास जोधपूर आणि नोएडा येथे काळ्या यादीत टाकले असतानाही ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्याकरिता १०८ या उपक्रमाला २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्यात एकूण ‘१०८’ प्रकल्पांतर्गत ९३७ रुग्णवाहिकांची सेवा देण्यात येत आहे. त्यात २३३ अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्टिंग रुग्णवाहिका आणि ७०४ बेसिक लाईफ रुग्णवाहिका यांची सेवा राबविण्यासाठी मे. बी. व्ही. जी. इंडिया या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती.

पाच वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर ३१ जानेवारी २०१९ रोजी या कंत्राटदाराचे कंत्राट संपल्यानंतर तातडीची बाब म्हणून १ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी एक समितीही नेमण्यात आली होती. त्यानंतर समितीने केलेल्या शिफारशीनुसार आणि मंत्रिमंडळाने दिलेल्या अंतिम मान्यतेनंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR