22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रहिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर : विरोधी पक्षांकडून नेहमीच नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली जाते आणि सत्ताधारी मात्र त्याला गांभीर्याने घेत नाहीत, असा गेल्या काही वर्षांत आलेला अनुभव. आता पुन्हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान दोन दिवस वाढवा, अशी मागणी केली आहे.

१९५६ च्या राज्य पुनर्रचनेनुसार विदर्भ प्रांत समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे नागपूरने राजधानीचा दर्जा गमावला. त्यापूर्वी, २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन वर्षातून एकदा तरी नागपुरात घेण्यात यावे, अशी तरतूद करण्यात आली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. करारानुसार १९६० चे पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात आले. ते आजतागायत तिथे भरवले जाते.

हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असून विदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी किमान दोन दिवस वाढवावा, अशी विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे. मुंबई येथे विधानभवनात २९ नोव्हेंबर २०२३ रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशन कालावधी वाढविण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असा सर्वानुमते निर्णय झाला होता, त्याप्रमाणे निर्णय घ्यावा, अशी विनंती वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR