24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयगोध्रा येथे भीषण अपघात; दोन बसच्या धडकेत चार ठार

गोध्रा येथे भीषण अपघात; दोन बसच्या धडकेत चार ठार

अहमदाबाद : गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा येथे मंगळवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे दोन बसच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बसला खासगी लक्झरी बसने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. दाहोद-गोध्रा महामार्गावर झालेल्या या अपघातात दोन लहान मुले आणि दोन महिलांना आपला जीव गमवावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला.

इंदूरला जाणारी बस महामार्गाच्या बाजूला काही बिघाडामुळे उभी होती आणि तिची दुरुस्ती सुरू होती. गोध्राच्या एसडीएमने सांगितले की, या वेळी लक्झरी बसच्या चालकाला पार्क केलेली बस दिसत नव्हती आणि त्याने पार्क केलेल्या बसला मागून धडक दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी नऊ जणांवर गोध्रा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर इतर दोघांना वडोदरा येथे पाठवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR