29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये भीषण अपघात; ८ ठार

छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; ८ ठार

बेमेटारा : छत्तीसगडमधील बेमेटारा जिल्ह्यातील काठिया गावातील पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. मालवाहू वाहन आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात पाच महिला आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. तर वाहनातील इतर २३ जण जखमी झाले आहेत. या जखमींना बेमेटारा जिल्हा रुग्णालय, सिमगाच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. काही गंभीर जखमींना रायपूरच्या एम्समध्ये पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा बेमेटारा जिल्ह्यातील काठिया गावाजवळ हा अपघात झाला. बेमेटारा जिल्ह्यातील पाथरा गावातील लोक नामकरण सोहळ्साठी तिरैया गावात गेले होते. एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वजण पतर्रा गावी घरी परतत होते.

मालवाहू वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मिनी ट्रकला धडकले. या अपघातात पाच महिला आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. तर यातील २३जखमींना दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार गंभीर जखमींना रायपुरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये पाठवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR