18.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जतमध्ये कारचा भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

कर्जतमध्ये कारचा भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

रायगड : जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. इनोव्हा कारचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्जत किरवली ब्रीजवरून कार खाली कोसळली त्यानंतर ती तिथून जाणा-या मालगाडीला धडकली.

या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाही, मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मध्यरात्री साडेतीन वाजता इनोव्हा कारचा भीषण अपघात घडला आहे. ही कार पुलावरून खाली कोसळली त्यानंतर ती मालगाडीला धडकली. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रिपाइंचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. कार पुलावरून खाली कोसळली त्यानंतर मालगाडीला धडकली, या अपघातामध्ये तिघांना आपला जीव गमावावा लागला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR