मुंबई : लोहगड येथे लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले. या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.
लोहगड येथे लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून राज्यभरात खळबळ उडवून देणा-या लोहगड हत्या प्रकरणाने पुरुषांवरील अत्याचार किंवा हल्ल्यासंदर्भातील दुसरी बाजू समोर आल्याचे बोलले जात आहे. आपल्या प्रियकरासोबत कट रचून होणा-या नव-याला निर्दयीपणे संपवल्याच्या गुन्ह्यात आरोपी सिया आणि तिचा प्रियकर चेतनला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी, पुणे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आता आपला मोर्चा आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाकडे वळवला असून थेट सियाच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्या आले आहे. दुसरीकडे आपल्या मुलाच्या न्यायासाठी अग्रवाल कुटुंबीय मुख्यमंत्र्यांकडे पोहोचले होते.
















