पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत अजित पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
एकीकडे या निकालाचा जल्लोष सुरु असताना निकालानंतर हाणामारी अन् गोळीबाराच्या घटना घडल्या. इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये निवडणुकीत पराभूत झाल्याने हवेत गोळीबार केला गेला. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील काझड गावात गोळीबार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुल चांगदेव नरुटे आणि समीर नरुटे यांनी शिवीगाळ करून हवेत गोळीबार केला. प्रकरणी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.