23.4 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeराष्ट्रीयकोची जवळच्या समुद्रात बुडतेय परदेशी जहाज

कोची जवळच्या समुद्रात बुडतेय परदेशी जहाज

तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले

कोची : केरळमधील कोचीजवळच्या समुद्रात एक परदेशी जहाज बुडत आहे. दरम्यान, तटरक्षक दलाने त्वरित मोर्चा सांभाळून जहाजातील २४ पैकी ९ जणांना वाचवले आहे. उर्वरित कर्मचा-यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे मालवाहू जहाज लायबेरियाचे असून आतापर्यंत ते अर्ध बुडाले आहे.

१८४ मीटर लांबीचे आणि लायबेरियाचा झेंडा असलेले हे कंटेनर जहाज एमएससी ईएलएसए ३, २० मे रोजी कोची येथे पोहोचले होते. तिथून ते २३ मे रोजी विझिंगम बंदरातून रवाना झाले. २४ मे रोजी सुमारे १ वाजून २५ मिनिटांनी मेसर्स एमएससी शिप मॅनेजमेंटने भारतीय अधिका-यांना कोची येथून सुमारे ३८ नॉटिकल मैल दक्षिण पश्चिमेला आपल्या जहाजावर २६ डिग्रीच्या लाटा उसळल्याची माहिती दिली आणि त्वरित मदतीची मागणी केली.

त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने बचाव कार्यास सुरुवात केली. दुर्घटनाग्रस्त जहाजावर विमानाद्वारे टेहळणी सुरू केली. जहाजावर असलेल्या २४ जणांपैकी ९ कर्मचा-यांनी जहाज सोडून लाईफ बोटीवर आश्रय घेतला आहे. तर उर्वरित १५ कर्मचा-यांना वाचवण्यासाठी अभियान सुरू आहे. या दुर्घटनेनंतर जीवितहानी आणि पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी तटरक्षक दलाकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR