36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयमाजी हवाई दल प्रमुख आर.के.एस. भदौरियांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी हवाई दल प्रमुख आर.के.एस. भदौरियांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहिर होताच देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून, इंडिया आघाडीच्या नेत्यांना अटक करण्यात गुंतल्या आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या गोटात काँग्रेसच्या नेत्यांसह अनेक छोट्या-मोठ्या पक्षाच्या नेत्यांची आवक सुरू झाली आहे. दरम्यान, माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया आणि ज्येष्ठ वायएसआरचे नेते व्ही. प्रसाद राव यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात राकेश कुमार सिंह भदौरिया आणि व्ही प्रसाद राव यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आणि दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी अनुराग ठाकूर म्हणाले की, आरके भदौरिया आणि व्ही प्रसाद राव यांचे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षात सामील झाल्यामुळे त्यांचे स्वागत आहे. माजी एअर चीफ मार्शल आरके भदौरिया आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेत खूप सक्रिय आहेत. आणि आता त्यांचे भाजपसाठी राजकीय योगदान मिळणार आहे, असे ठाकूर म्हणाले.

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू-भदौरिया

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश होताच माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश देवून राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले. याशिवाय माजी हवाई दल प्रमुख म्हणाले की त्यांनी भारतीय हवाई दलात चार दशकांहून अधिक काळ सेवा केली. मात्र भाजप सरकारच्या नेतृत्वाखालील ८ वर्षे त्यांच्या सेवेचा सर्वात चांगला काळ होता, मोदींच्या विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे भदौरिया म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR