38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांसोबत साजरी केली होळी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांसोबत साजरी केली होळी

लेह : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये लष्कराच्या जवानांवर गुलालाची उधळण करून होळीचा सण साजरा केला. संरक्षणमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करून ही माहिती दिली. या पोस्टमध्ये संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी मला संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली, त्याच दिवशी मी सियाचीनला पहिली भेट दिली होती. मी सियाचीनला लवानासोबत होळी साजरी करण्यासाठी जाणार होतो मात्र, आज खराब हवामानामुळे सियाचीनला जाणे शक्य झाले नाही. म्हणून मी लेहहून तेथे तैनात असलेल्या सर्व सैनिकांना होळीच्या शुभेच्छा देतो .

राजनाथ सिंह म्हणाले की, मी अनेक प्रसंगी आपल्या सैन्यातील जवानांना भेटत असतो. पण होळीच्या निमित्ताने तुम्हांला भेटणे आणि तुमच्यासोबत होळी खेळणे हा माज्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे. सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद केवळ आपल्या कुटुंबीयासोबतच येतो.

भारत हा सण आणि उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो. होळी, दिवाळी, ईद, ख्रिसमस यांसारख्या सणांमध्ये लोक कुठेही असले तरी ते या सणासाठी आपल्या कुटुंबाकडे परत येतात आणि आनंद साजरा करतात. तो आनंद वाटून घेण्यासाठी आणि होळीचा सण साजरा करण्यासाठी मी माज्या कुटुंबात आलो आहे. मी माज्या कुटुंबासोबत रंग खेळायला आलो आहे असे संरक्षणमंत्री म्हणाले.

प्रत्येक सण सैनिकांसोबत साजरा करा

दरम्यान, दिवाळीचा पहिला दिवा आणि होळीचा पहिला रंग, हा आपल्या देशाचे रक्षण करणा-या जवानांच्या नावाने असावा, असे संरक्षणमंत्री म्हणाले. आपल्या सैनिकांसोबत आपण असले पाहिजे. देशातील सण सर्व प्रथम सियाचीन , कारगिलच्या शिखरांवर आणि राजस्थानच्या वाळूच्या मैदानात तैनात असलेल्या जवांनासोबत, आणि हिंदी महासागरात पाणबुड्यावर तैनात असलेल्या भारतीय नौदलासोबत साजरा केला पाहिजे असे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR