35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभेचे माजी खासदार बासुदेव आचार्य यांचे निधन

लोकसभेचे माजी खासदार बासुदेव आचार्य यांचे निधन

हैदराबाद : माजी लोकसभा खासदार आणि सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते बासुदेव आचार्य (८१) यांचे सोमवारी हैदराबाद येथे निधन झाले. आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते १९८० ते २००९ या काळात पश्चिम बंगालच्या बांकुरा येथून ९ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. हैदराबादमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ते सलग नऊ वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने राजकीय विश्वात शोककळा पसरली आहे. कामगार वर्गातील एक महान नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पश्चिम बंगालच्या बांकुरा लोकसभा मतदारसंघातून ते सलग नऊ वेळा निवडून आले. २००४ पासून ते लोकसभेतील सीपीआय(एम) पक्षाचे नेते होते. बासुदेव आचार्य हे सीपीआय(एम)च्या केंद्रीय समितीचे सदस्य होते.

तसेच लोकसभेत असताना ते रेल्वे विषयक समिती, सदस्य, नियम समिती, सामान्य उद्देश समिती, संसदीय संकुलातील सुरक्षा समिती आणि संसद भवनात राष्ट्रीय नेत्यांचे आणि संसद सदस्यांचे पोर्ट्रेट/पुतळे बसविण्यावरील समितीशी संबंधित होते. त्यांनी १९९० ते १९९१ पर्यंत सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९९३ ते ९६ दरम्यान ते सरकारी आश्वासन समितीचे अध्यक्ष होते. १९९० ते १९९६ पर्यंत ते रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR