15.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeसोलापूरअल्पवयीन पीडितेवर सामूहिक अत्याचार, ८ जणांना जन्मठेप

अल्पवयीन पीडितेवर सामूहिक अत्याचार, ८ जणांना जन्मठेप

सोलापूर : सोलापुरातील एका शैक्षणिक संस्थेत शिकत असलेल्या अल्पवयीन पीडितेशी ओळख करून तब्बल ११ जणांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांनी याप्रकरणातील आठ आरोपींना दुहेरी जन्मठेप, तर तिघांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

प्रवीण राठोड, गणेश उर्फ अक्षय चव्हाण, आनंद उर्फ राजवीर राठोड, रोहित राठोड, दिनेश राठोड, चेतन राठोड, करण भरले, सतीश जाधव या आठजणांना दुहेरी जन्मठेप, तर राज उर्फ राजकुमार देसाई, सचिन राठोड व गौरव भोसले या तिघांना २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये पीडिता घरातून त्या शिक्षण संस्थेत रिक्षातून जात होती. यावेळी तिची आरोपी सचिन श्रीकांत राठोड (वय २४) याच्यासोबत ओळख झाली.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्याने पीडीतेला लग्नाचे आमिष दाखवून शहराबाहेरील लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यानंतर तिला रंगभवन येथे सोडले. त्याचवेळी राज उर्फ राजकुमार सिद्राम देसाई (वय २३) याने तिला रिक्षात बसवून नेले. एका मैदानावर अत्याचार केला. त्याच दिवशी पीडिता सायंकाळी पाचच्या सुमारास घराबाहेर पडली. त्यावेळी प्रवीण श्रीकांत राठोड याने रिक्षात बसवून शहराबाहेरील लॉजवर नेले आणि अत्याचार केला तसेच त्याचा मित्र राजवीर यानेदेखील तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म केले.

त्यानंतर तीन आरोपींनी पीडित मुलीला वही देण्याचा बहाणा करून बोलावून घेऊन शहराबाहेर जंगलात नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक दुष्कर्म केले तसेच अन्य आरोपींनीदेखील कारमधून जुळे सोलापूर परिसरात नेऊन तिच्यावर कारमध्येच अत्याचार केले होते. याप्रकरणी पीडित मुलीने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करून ११ आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

त्यात पीडितेची आई, ओळख परेड पंच, घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटोग्राफर आदींच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या गुन्ह्यामध्ये एकूण सात घटनास्थळे तपासण्यात आली आहेत. या गुन्ह्याबाबत न्यायालयामध्ये आठ दोषारोपत्र दाखल करण्यात आली आहेत.

आरोपींना ही पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे व ती मागासवर्गीय जातीची असल्याचे माहिती असतानाही तिच्यावरआळीपाळीने दुष्कर्म केले. ही घटना कोणास सांगितली तर ठार मारण्याची धमकी दिली, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी केला. तो ग्रा धरून न्यायाधीशांनी आठ आरोपींना २० वर्षे शिक्षा, तर सर्व आरोपींना एकूण २१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, आरोपींतर्फे अ‍ॅड. नागराज शिंदे, अ‍ॅड. इस्माईल शेख, अ‍ॅड. सुरेश चव्हाण, अ‍ॅड. एस. एम. झुरळे, अ‍ॅड. फिरोज शेख यांनी काम पाहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR