22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeउद्योगगौतम अदानींनी विकत घेतली ७७५ कोटींची कंपनी

गौतम अदानींनी विकत घेतली ७७५ कोटींची कंपनी

नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्यासाठी २०२४ ची सुरुवात चांगली झाली आहे. २०२४ मधील पहिली मोठी खरेदी केली त्यांनी केली. अदानी समूहाच्या सिमेंट क्षेत्रातील एसीसी लिमिटेडने एसीसीपीएल नावाच्या कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, सोमवारी ८ जानेवारी रोजी अदानी समूहाच्या एसीसी लिमिटेडने एसीसीपीएलचे अधिग्रहण पूर्ण केले. सिमेंट क्षेत्रात अदानी समूहाचे वर्चस्व वाढवणारा हा करार एकूण ७७५ कोटी रुपयांना पूर्ण झाला आहे. नवीन वर्षात अदानी समूहाच्या या पहिल्या मोठ्या डीलचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे.

एसीसी लिमिटेड ही अदानी समूहाच्या सिमेंट फर्म अंबुजा सिमेंटची उपकंपनी आहे आणि तिची एसीसीपीएल मध्ये आधीच 45 टक्के भागीदारी होती. आता कंपनीने आपल्या विद्यमान प्रवर्तकांकडून उर्वरित ५५ टक्के भागभांडवल देखील विकत घेतले आहे या ५५ टक्के भागभांडवल खरेदीची किंमत ४२५.९६ कोटी रुपये आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR