नागपूर : आर्थिक अनिश्चितता आणि टॅरिफ वॉरचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येत आहे. भारतात शनिवारी सोन्याचे दर (२४ कॅरेट) शुक्रवारच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढून ३ टक्के जीएसटीसह ९९,०८६ रुपयांवर पोहोचले. हे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर असून त्यांनी खरेदी थांबविली आहे. केवळ श्रीमंतच गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करीत आहे.
सध्याच्या दरवाढीमुळे काही दिवसांआधी सोन्याचे भाव कमी होण्याचा तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज फोल ठरला. पुढे दर कमी होणार नाहीत, हे लोकांना कळाले आहे. केवळ एप्रिल महिन्यातच सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. काहीच दिवसांत दहा ग्रॅम सोन्यासाठी एक लाख रुपये मोजावे लागतील. यासोबतच चांदी पुन्हा लाख रुपयांकडे झेप घेत आहे. तर सोने शनिवारी एक हजारांची वाढ झाली. भाव ३ टक्के जीएसटीसह ९९,०८६ रुपयांवर पोहोचले.