परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा छ. संभाजीनगर येथे दि.२३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुलांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागास फाईल प्रकारात सुवर्णपदक मिळाले.
नूतन विद्यालय सेलूचा खेळाडू प्रसाद संजय महाले यास सुवर्णपदक तर ओयासिस इंग्लीश स्कुल परभणीच्या १९ वर्षे मुली गटात साईना पांडूरंग रनमाळ हिने फॉईल या प्रकारात सांघीक गटातुन सुवर्णपदक, सेबर प्रकारात सानिया पांडूरंग रनमाळ हिने सांघीक गटातुन कांस्य पदक प्राप्त केले. एन.आय. एस. प्रशिक्षक संजय भुमकर, प्रशांत नाईक, क्रीडा शिक्षक सुशिल जोरगेकर, सुर्यभान बुचाले, स्मीता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी खेळाडूचे नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. एस. एम.लोया, सचिव डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, मुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे, प्राचार्य महेंद्र मोताफळे, कृष्णा निकम, किरण रोपळेकर, सुचिता मोताफळे, राज्य सहसचिव डॉ. पांडुरग रणमाळ, गणेश माळवे, प्रशांत नाईक व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.