देणगी चोरीवरून सरकार आणि सर्वोच्च न्यायालयात जुंपली

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी वेळी एसआयटी तपासाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. एका वकिलांनी एसआयटी आणि ट्रस्टच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की एसआयटी आम्ही गठीत केलेली आहे आणि ती न्यायालयास उत्तरदायी आहे. एसआयटीला त्यांच्या चौकशी रिपोर्ट न्यायालयाला सादर करावा लागेल. दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, एसआयटीचा रिपोर्ट कोणत्याही अज्ञात पक्षकाराला देता येणार नाही.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले एसआयटीला तपास अहवाल सादर करावा लागेल. याचिकाकर्त्यांबरोबरच लोकांनाही याची परवानगी आहे की, एसआयटीने आणखी कोणत्या बाबींचा तपास करायला हवा, हे ते सांगू शकतात. सॉलिसिटर जनरल यांच्या कार्यालयात हे सल्ले पाठवण्यात यावेत. त्यानंतर ते एसआयटीकडे पाठवण्यात येतील. एसआयटी आपला तपास अहवाल सीलबंद पाकिटात सर्वोच्च न्यायालयाला सादर करेल. आधी आम्ही तो रिपोर्ट बघू आणि त्यानंतर ठरवू की, तर पक्षकारांसमोर ठेवायचा आहे की नाही असेही न्यायालय म्हणाले.

केंद्र सरकारने काय म्हटले आहे?
केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की सर्व निर्देशाचे पालन केले जात आहे. गुन्हेगारी प्रकरणाचा तपासाची माहिती फक्त पक्षकार, न्यायालय, पीडित आणि आरोपींना देता येऊ शकतो. इतर बाहेरच्या कोणालाही देत येत नाही.

प्रकरणाचा तपास सुरू
सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, तपास स्थितीचा रिपोर्ट सीलबंद पद्धतीने न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. अजून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे आम्हाला सांगण्यात आले असून या प्रकरणाची सुनावणी पुढील तारीख देण्यात येत आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानेच तपासाबद्दलचा रिपोर्ट मागवला होता. न्यायालयात चार याचिका दाखल असन, यात एक सीबीआयकडून स्वतंत्रपणे तपास करणे, श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या आर्थिक व्यवहाराची कॅग ऑडिट करणे, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहाराच्या सर्व नोंदी सुरक्षित ठेवणे आणि तपास पूर्ण होईपर्यंत मोठे आर्थिक निर्णय घेण्यास बंदी घालण्याच्या मागण्या या याचिकांमधून करण्यात आलेल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news