20.1 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरनशेच्या औषधाचे मध्य प्रदेशानंतर गुजरात कनेक्शन

नशेच्या औषधाचे मध्य प्रदेशानंतर गुजरात कनेक्शन

खासगी बसमधून १७०० गोळ्यांसह तिघे अटकेत पोलिसांचा तपास सुरूच

छत्रपती संभाजीनगर : सुरतवरून नशेसाठी वापरल्या जाणा-या औषधांचा साठा घेऊन शहरात येणा-या तीन कुख्यात तस्करांना सायबर पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. नगर नाक्याला ट्रॅव्हल्स पोहोचताच पोलिसांनी सय्यद सलमान सय्यद सऊद (वय २७, रा. अल्तमश कॉलनी), माजिद बेग युनूस बेग (२४) व शेख अकबर शेख सलीम (२३, दोघे रा. बायजीपुरा) यांच्या मुसक्या आवळल्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले.

बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, यातील सय्यद सलमान याला तीन महिन्यांपूर्वी एनडीपीएस पथकाने अमली पदार्थांच्या तस्करीत अटक केली होती. त्या गुन्ह्यात तो १५ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता. त्याच्यासह माजिदवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, जामिनावर सुटताच पुन्हा त्याने सुरतमधील विक्रेत्याला संपर्क करून गोळ्यांची ऑर्डर दिली. बायजीपु-यातील काही गुन्हेगार गुजरातच्या सुरतवरून नशेच्या औषधांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

पांढरे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक सागर पाटील, संदीप शिंदे यांनी पथकासह मंगळवारी सकाळी नगर नाक्यावर आरआर कंपनीची ट्रॅव्हल्स येताच थांबवण्यात आले. बेसावध असलेल्या तिघांना तत्काळ बसमधून ताब्यात घेण्यात आले. तपासणीत त्यांच्याकडे नशेखोरांकडून वापरल्या जाणा-या १७०० गोळ्यांचा साठा आणि १० पातळ औषधांचा बाटल्या व एक नवीन खरेदी केलेला चाकू मिळून आला. अंमलदार विनोद परदेशी, सुधीर मोरे, रंजक सोनवणे, सुनील बेलकर, नितीन देशमुख, सतीश हंबर्डे, राजाराम वाघ, सोहेल पठाण व प्रमोद सुरसे यांनी कारवाई पार पाडली.

कपडे व्यवसायाचा केला बहाणा
कोणाला संशय येऊ नये म्हणून तिघांनी सुरतला होलसेल कपडे खरेदीसाठी बहाणा रचला. गोळ्यांसाठी एक लाख रुपये व्याजाने घेऊन ते सूरतला गेले होते. नव्याने खरेदी केलेल्या कपड्यांमध्ये हे औषधी व चाकू लपवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR