24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रप्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून पोहोचला शाळेत

प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून पोहोचला शाळेत

पुणे : असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. माणूस एकदा प्रेमात पडला की पुढचं-मागचं काही बघत नाही ना कसला विचार करतो. एकमेकांना भेटण्यासाठी मजल-दरमजल करायलाही प्रेमवीर तयार होतात. पण अशावेळेला चुकूनही पकडले गेले तर मात्र मोठा गोंधळ उडतो. बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रेमवीराची अशीच एक भेट फसल्याचा काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे.

दरम्यान, पुणे येथे एक प्रियकर त्याच्या अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यााठी खूपच उतावीळ झाला होता. एवढा की तिच्या भेटीसाठी त्याने सरळ बुरखा घातला आणि तो थेट तिच्या शाळेतच जाऊन घुसला. पण त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला. कारण तो शाळेत घुसताच आसपासच्या लोकांनी त्याला सरळ पकडले. मुले चोरणारी टोळी आल्याची अफवा आजूबाजूला पसरली. आणि तो तरुणही त्या टोळीचाच एक मेंबर असल्याचे समजून नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पकडून थेट पोलिसांच्याच ताब्यात देण्यात आले. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली. विजय अमृत वाघारी असे तरुणाचे नाव असून विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण विजय वाघारी याचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम आहे. ती आदर्श इंदिरानगर शाळेत शिकते. दोघेही एकमेकांना भेटायचे, फिरायलाही जायचे. मात्र त्या दोघांच्याही घरच्यांना त्याच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली. त्यांना हे मान्य नसल्याने दोघांनाही कुटुंबीयांनी समज दिली आणि एकमेकांना भेटण्यास बंदी घातली. मात्र प्रेयसीला भेटता येत नसल्याने विजय व्याकूळ झाला.

म्हणून त्याने तिला भेटण्यासाठी एक शक्कल लढवली. त्याने सरळ बुरखा घातला आणि प्रेयसीच्या शाळेत घुसला. पण त्याचा हा प्लॅन त्याच्याच अंगलट आला आणि उलटला. परिसरातील नागरिक त्याला मुलं चोरणा-या टोळीचा मेंबर समजले आणि पकडून त्याच्यावर हात साफ करत चोपून काढले. त्यानंतर पोलिसांना बोलावून ताब्यात दिले.
………

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR