नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचाच बोलबाला दिसून येत आहे. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी आयसीसी क्रमवारीत बाजी मारली आहे. आयसीसी क्रमवारीत टेस्ट आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा युवा स्टार शुभमन गिल अव्वल फलंदाज आहे आणि मोहम्मद सिराज गोलंदाजीत पहिल्या क्रमांकावर आहे. अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर १ गोलंदाज आहे.
भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय क्रिकेटसोबतच कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमध्येही अव्वल आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. शुभमन गिल आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे, तर गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद सिराज अव्वल स्थानावर आहे.
याशिवाय अश्विन कसोटी फॉरमॅटमध्ये नंबर-१ गोलंदाज आहे. तर रवींद्र जडेजा कसोटी फॉर्मेटमध्ये नंबर १ अष्टपैलू खेळाडू आहे. सूर्यकुमार यादव हा टी-२० फॉरमॅटमध्ये नंबर १ फलंदाज आहे.