33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरमधून हेमंत सावरांना उमेदवारी

पालघरमधून हेमंत सावरांना उमेदवारी

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा विद्यमान खासदार असूनदेखील भाजपने ही जागा खेचून घेतली. त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाला आहे. हेमंत सावरा यांच्या उमेदवारीसाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आग्रही होते. त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

हेमंत सावरा यांची लढत ठाकरे गटाच्या भारती कामडी यांच्याशी असणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद आहे. त्यांच्या पक्षाचे ३ खासदार या मतदारसंघात आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाची भूमिका लोकसभा निवडणुकीत महत्वाची असणार आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विद्यमान खासदार असतानाही त्यांना जागा खेचून आणता आलेली नाही. त्यामुळे भाजपने येथे बाजी मारली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR