33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपारनेरचे माजी आमदार विजय औटी निलंबित

पारनेरचे माजी आमदार विजय औटी निलंबित

नगर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना विरोध करून सुजय विखेंना पाठिंबा देणे हे माजी आमदार विजय औटी यांना भोवले आहे. विजय औटी यांना शिवसेना ठाकरे गटातून निलंबित करण्यात आले आहे. विजय औटी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे म्हणत पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने हे निलंबन करण्यात आले.

अहमदनगर दक्षिण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या निलंबनाचे पत्र काढले आहे. विजय औटी यांनी मविआमध्ये असताना भाजप उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा दिल्याने नगर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषदेत घेत आम्ही सर्वजण महाविकास आघाडीसोबत म्हणजेच निलेश लंके यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. त्यातच आता विजय औटी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR