काम करण्याच्या हायब्रिड पॉलिसीमुळे कर्मचा-यांची दमछाक

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटानंतर वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती जगभरात मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना घरूनच काम करण्याचे स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे लाखो कर्मचा-यांचा प्रवासाचा वेळ आणि ताण वाचला. परंतु, आता परिस्थिती बदलत असून अनेक कंपन्या पुन्हा आपल्या जुन्या कार्यपद्धतीकडे म्हणजेच हायब्रिड मॉडेलकडे वळत आहेत.

कंपन्यांच्या या अचानक बदललेल्या धोरणांमुळे कर्मचा-यांसमोर नवीन अडचणी आणि प्रश्न निर्माण होऊ लागल्या आहेत. एका कर्मचा-याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कर्मचा-याला आता आठवड्यातून दोन दिवस ऑफिसमध्ये जाण्यासाठी दररोज तब्बल ११५ किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याचे त्याने म्हटले आहे. रेड्डिट या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये कर्मचा-याने आपली आपबिती सांगितली आहे. त्याला पाच वर्षांचा अनुभव असून गेल्या वर्षभरापासून एका मार्केटिंग कंपनीत काम करत आहे.

कंपनीने आधी वर्क फ्रॉम होमची अट ठेवूनच नोकरी दिली होती. परंतु आता अचानक ऑफिसमध्ये बोलावल्यामुळे कर्मचा-याला रोजच लांबचा प्रवास करावा लागत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यातच कंपनीत पगारवाढ आणि करिअरच्या वाढीबाबत (अप्रायझल) कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे या कर्मचा-याने आता नवीन नोकरी शोधण्यास सुरुवात केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. ऑफिस आणि घर अशी दुहेरी तारेवरची कसरत केल्यानंतर मन अस्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम आपल्या कामावर देखील होते. आपल्या कामावर परिणाम न होता काम करण्यासाठी घराप्रमाणे ऑफिसमध्ये देखील एका समान सेट अपची आवश्यकता आहे. त्यासाठी एक आरामदायक जागा असणे गरजेचे आहे. ऑफिसप्रमाणे घरी एक सेट बनवणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या कामावर परिणाम होणार नाही. घरी वर्क टेबल आणि खुर्चीसह अन्य महत्त्वाच्या गोष्टी ठेवणे गरजेचे आहे. रोज काम सुरू करण्याची एक निश्चित वेळ ठरवावी. रोज ठरलेल्या वेळेत काम सुरू करावे. उदा. वर्क फ्रॉम होम करताना ईमेल आणि ऑफिसचे मेसेज वाचण्याची निश्चित अशी वेळ नव्हती. मात्र ऑफिसमध्ये काम करताना काम बंद करण्याची वेळ ठरलेली असते. एका विशिष्ठ वेळी काम बंद करणे गरजेचे आहे.

प्रवास हेच ले ऑफचे कारण
नवीन मुलाखतीदरम्यान जुनी नोकरी सोडण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारल्यावर या कर्मचा-याने अत्यंत हुशारीने उत्तरे दिली. कंपनीतील नोकरी कपात (लेऑफ) आणि घरापासून ऑफिसचे अंतर जास्त असणे हे कारण त्याने मुलाखतीत सांगितले. तसेच, आपल्याला फक्त घरून काम करायचे नाही तर, दररोजचा प्रवास कमी आणि सोयीचा असावा असेही त्याने मुलाखतकाराला स्पष्टपणे सांगितले.

कर्मचा-यांना हायब्रिड पध्दतीची भीती
या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही युजर्सच्या मते, आजकाल लांबचा प्रवास करणे ही एक सामान्य बाब झाली आहे. तर काहींनी नवीन कंपनीत सुद्धा भविष्यात अशीच हायब्रिड पद्धत लागू केली जाऊ शकते. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, असा सल्ला दिला. एका युजरने सांगितले की पूर्णपणे वर्क फ्रॉम होम हवे असल्यास कंपनीच्या ऑफर लेटरमध्ये ही अट लिहून घेतली पाहिजे असे सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44

Latest news