33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeक्रीडाहैदराबादचे राजस्थानसमोर २०२ धावांचे आव्हान

हैदराबादचे राजस्थानसमोर २०२ धावांचे आव्हान

हैदराबाद : नितीश रेड्डीचे विस्फोटक अर्धशतक आणि हेनरिक क्लासेनचा फिनिशिंग टचच्या जोरावर हैदराबादने राजस्थानसमोर २०२ धावांचे विराट आव्हान ठेवले आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी कराताना निर्धारित २० षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात २०१ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून नितीश रेड्डी याने नाबाद ७६, क्लासेन याने नाबाद ४२ आणि ट्रेविस हेड याने ५८ धावांचे योगदान दिले.

हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तात तंबूत परतला. अभिषेक शर्माला आवेश खान याने तंबूचा रस्ता दाखवला. अभिषेकने १० चेंडूमध्ये एका षटकाराच्या मदतीने १२ धावांचे योगदान दिले. तिस-या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनमोलप्रीत सिंह यालाही छाप पाडता आली नाही. अनमोलप्रीत सिंह फक्त पाच धावा काढून बाद झाला. हैदराबादची सुरुवात खराब झाल्यामुळे राजस्थानचा संघ कुरघोडी करणार असेच वाटले होते. पण हेड आणि रेड्डी यांनी डाव हाणून पाडला.

दोन विकेट झटपट गेल्यानंतर ट्रेविस हेड आणि नितीश रेड्डी यांनी डावाची सुत्रे हातात घेतली. हेड शांत खेळत होता, तर रेड्डीने चौफेर फटकेबाजी केली. दोघांनी हैदराबादच्या डावाला आकार दिला. मधल्या षटकात दोघांनीही फिरकी गोलंदाजांचा समाचार घेतला. अश्विन आणि चहल यांच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. चहलच्या चार षटकात सहा षटकार ठोकले. खासकरुन रेड्डी आक्रमक फलंदाजी करत होता. रेड्डी आणि हेड यांनी तिस-या विकेटसाठी ५७ चेंडूत ९६ धावांची भागिदारी केली.

ट्रेविस हेड याने ४४ चेंडूमध्ये संयमी ५८ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकार ठोकले. हेड याने शांततेत एक बाजू लावून धरली, दुस-या बाजूने रेड्डीने राजस्थानची गोलंदाजी फोडली. हेड बाद झाल्यानंतर क्लासेन आणि रेड्डी यांनी विस्फोटक फलंदाजी केली. दोघांनी अखेरच्या षटकात अर्धशतकी भागिदारी केली. नितीश रेड्डी याने ४२ चेंडूमध्ये नाबाद ७६ धावांची खेळी केली. यामध्ये आठ षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. हेनरिक क्लासेन याने १९ चेंडूमध्ये तीन षटकार आणि तीन चौकार ठोकले. क्लासेन आणि रेड्डी यानं ३२ चेंडूमध्ये नाबाद ७० धावांची भागिदारी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR