21.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeक्रीडामी तुझ्यावर कायम प्रेम करेन...

मी तुझ्यावर कायम प्रेम करेन…

अनुष्काने विराट कोहलीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आज त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या ३५ व्या वाढदिवशी विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. २००८ मध्ये भारतासाठी खेळून कारकीर्दीची सुरुवात करणारा कोहली आज तमाम चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी आणि त्याच्या चाहत्यांनी विराटवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र विराटला त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने ‘ मी तुझ्यावर कायम प्रेम करेन…’ असे म्हणत खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे. अनुष्का आणि विराटची बाँडिंग सर्वांनाच माहीत आहे. अनुष्का विराटची मस्करी करण्याची एकही संधी सोडत नाही. आता अनुष्काने विराटचे काही फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काने विराट कोहलीचे काही फोटो पोस्ट करत लिहिले की, तो आयुष्यातील प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट आहे! तसेच, तो त्याच्या कॅप्टन कॅपमध्ये आणखी काही नवीन उपलब्धी जोडत आहे. मी तुझ्यावर नेहमी, या जीवनात आणि प्रत्येक क्षणी, काहीही झाले तरी असेच प्रेम करेल.

विशेष म्हणजे या पोस्टमध्ये अनुष्काने २०११ सालातील एक बातमी शेअर केली आहे. यावर विराटनेही इमोजी कमेंट केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या पोस्टला कमेंट करत विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत तर अनुष्काच्या फोटोंचे कौतुक करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR