कोल्हापूर : देशातील चार राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणूक होत असून तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल समोर येत आहे. या निकालात काही ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.
कोल्हापुरातील दूधगंगा वेदगंगा सहकारी अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान होत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बिद्री येथील मतदान केंद्रावर संस्था गटाचा प्रतिनिधी म्हणून मतदानाचा हक्क बजावला.
यावेळेस त्यांनी सत्ताधारी महालक्ष्मी करी विकास आघाडी या पॅनलच्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला. दरम्यान विधानसभा निवडणुकीतील पाच पैकी चार राज्यांत भाजप आघाडीवर आहे. गेल्या वेळेस या राज्यात भाजपला काहीच मिळाले नव्हते. कदाचित आम्ही त्यांच्यासोबत गेल्याचा हा पायगुण असावा, असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.