नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमध्ये पोहोचताच भव्य रोड शो केला. त्यानंतर स्थानिक रामकुंडावर जाऊन जलपूजन केले. मोदींनी काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शनही घेतले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोंदींसमोर युवांकडून देशभरातील संस्कृती आण कलेचे सादरीकरण करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात देशाचा वेगाने विकास झाला आहे.
देश महासत्तेच्या रुपात नावारुपाला येत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवात देशातील युवांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर युवांकडून देशभरातील संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी विविध कला सादर करण्यात आल्या. मोदींनी सर्वांना प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांच्या समोर नाशिक ढोल पथकाने ढोल वाद्याचे प्रदर्शन केले.