27.1 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाराज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बॅडमिंटन संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन रविवार, दि. २७ पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेसाठी परभणी जिल्हा शटल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह जामकर, सचिव रवींद्र पतंगे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी आलेले राज्याचे निवड समिती सदस्य चंद्रहास कान्हेरे (सातारा), मल्हार कुलकर्णी (अहमदनगर), जिल्ह्याचे बॅडमिंटन क्रीडा मार्गदर्शक उन्मेष गाडेकर, स्थानिक पंच म्हणून विकास जोशी, स्वरूप सोनिक, अजिंक्य गाडेकर, सुमित वाघ, गायकवाड, वंशिका तुलसानी, देशमुख, पृथ्वीराज हाके, अनुष निर्वळ हे सर्व स्पधेर्चे कामकाज पाहत आहेत.

या स्पर्धेसाठी १४, १७, १९ वर्षाखालील खेळाडू मुली राज्यभरातून ८ विभागातून सहभागी झाले आहेत. एकूण १२० खेळाडू व ७५ निवड चाचणीसाठी अशा २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांची चुरस या स्पर्धेनिमित्त परभणीकरांना बघण्यास मिळत आहे. उद्या निवड चाचणीमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू निवडले जातील. या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता कार्यालयातील क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, संजय मुंडे, सुयश नाटकर, रोहन औंढेकर, क्रीडा मार्गदर्शक कल्याण पोले, वरिष्ठ लिपिक रमेश खुणे, भागवत, धीरज नाईकवाडे, योगेश आदमे आणि प्रकाश पंडित यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR