38.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeक्रीडाविजेतेपदी भारत तिस-यांदा ?

विजेतेपदी भारत तिस-यांदा ?

जगभरातील क्रिकेटप्रेमी रविवारची वाट खूपच दिवसांपासून पाहत आहेत मात्र, हा रविवार खूपच खास आहे. कारण या दिवशी यजमान भारत विरुद्ध दबावाचे दडपण न घेता उत्कृष्ट खेळणा-या ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी शुक्रवारी दोन वरिष्ठ पीच क्यूरेटर आशिष भौमिक आणि तपोश चटर्जी यांच्यासह भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि बीसीसीआयचे देशांतर्गत क्रिकेटचे व्यवस्थापक एबी कुरुविला यांनी अंतिम सामन्यापूर्वी खेळपट्टीच्या तयारीचे निरीक्षण केले. खेळपट्टीवर वजनदार रोलरचा वापर केला. मात्र, ही पुष्टी केली जाऊ शकत नाही की, अंतिम सामन्यात नवीन खेळपट्टीचा वापर होईल की, वापरलेल्याच खेळपट्टीवर सामना खेळला जाईल.

एका क्यूरेटरच्या मते, ‘जर वजनदार रोलर काळ्या मातीच्या खेळपट्टीवर वापरला गेला, तर संथ फलंदाजी खेळपट्टी बनवली जाईल यावर मोठी धावसंख्या बनवली जाऊ शकते, पण सलग हिट करू शकत नाहीत. ३१५ धावसंख्येचा बचाव केला जाऊ शकतो. कारण, दुस-या डावात फलंदाज कठीण असेल.कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नेहमीप्रमाणे खेळपट्टी पाहण्यात बराच वेळ घालवला आणि दोन्ही क्यूरेटरशीही संवाद साधला.

नरेंद्र मोदी स्टेडिअम वर आतापर्यंत झालेल्या ३०सामन्यांत पहिल्याआणि दुस-या डावात फलंदाजी करणा-या संघांच्या विजयाची आकडेवारी एकसारखी आहे. प्रथम फलंदाजी करणा-या संघाने १५ सामने जिंकले आहेत, तर आव्हानाचा पाठलाग करणा-या संघालाही १५ वेळाच विजय मिळवण्यात यश आले आहे. मात्र, या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात तीन सामने आव्हानाचा पाठलाग करणा-या संघाने जिंकले आहेत.

या मैदानावर विश्वचषकात आतापर्यंत तीनशे धावांचा आकडा पार झाला नाही. भारताने अहमदाबादमध्ये एकमेव सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. यात पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकात १९१ धावातच गारद झाला होता भारताने ३०.३ षटकात सात विकेट्सने विजय मिळवला कर्णधार रोहित शर्माने ६३ चेंडूत सहा चौकार सहा षटकारासह ८६ धावा झोडपल्या होत्या कोलकत्यातील दुस-या उपांत्य सामन्यानंतर २०११च्या विश्वचषकातील उत्कृष्ट खेळाडू युवराजसिंग म्हणाला की, ‘भारताने ट्रॉफी जिंकली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेचे नशीब वाईट आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंबद्दल सहानुभूती आहे. याचे श्रेय ऑस्ट्रेलियन संघाला द्यावे लागेल. मोठ्या खेळांमध्ये ते वेगळे आहेत. दबावाखाली ते संयम राखतात. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोठी फायनल होणार आहे. भारत स्पष्टपणे फेव्हरिट आहे पण मला अपेक्षा आहे की ही फायनल खूप रोमांचक होईल. आणि अर्थातच भारताने तो जिंकला पाहिजे.’

भारतीय संघ चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. भारताने यापूर्वी १९८३, २००३ आणि २०११ मध्ये विजेतेपदाचा सामना खेळला होता. भारताने १९८३मध्ये लॉर्ड्स वर कपिल देवच्या नेतृत्वाखाली आणि २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनीने मुंबईत वानखेडे वर श्रीलंकेला हरवत ट्रॉफी जिंकली होती. भारताला २०१५ आणि २०१९ मध्ये उपांत्य फेरीतून बाहेर पडला होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यात कांगारूनी एकूण पाच वेळा विजेतेपदावर कब्जा केला आहे. ऑस्ट्रेलियाने १९८७,१९९९,२००३, २००७ आणि २०१५मध्ये विश्वचषक जिंकले आहेत.
या सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून रिचर्ड इलिंगवर्थ व रिचर्ड केटलबोरोची निवड करण्यात आली आहे. कॅटलबरोचे बहुतांश निर्णय भारतीयांच्या विरुद्ध गेले असल्याने चाहत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
– मैदानाबाहेरून
डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर
मोबा. ९४२२४ १९४२८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR