25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारतीय वंशाच्या अमेरिकन खासदाराच्या कार्यालयाची तोडफोड

भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदाराच्या कार्यालयाची तोडफोड

वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार ठाणेदार यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. ठाणेदार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. ठाणेदार यांनी तोडफोड केलेल्या कार्यालयाची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली आहेत, ज्यामध्ये कार्यालयाच्या भिंतींवर पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठीच्या घोषणा लिहिलेल्या दिसत आहेत.

याप्रकरणी ठाणेदार कार्यालयाच्या प्रवक्त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ठाणेदार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, अमेरिकन सांसद सदस्य असल्याने मला नेहमी लोकांशी बोलायचे आणि चर्चा करायची असते, दुर्दैवाने कम्युनिटी सेंटर कार्यालयमधील तोडफोड ही काही वेगळी घटना नाही आणि बोलण्याचा हा योग्य मार्गही नाही. हा सर्व केवळ भीती पसरवण्याचा आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. याआधीही मी अशा प्रकारच्या आंदोलनांचा सामना केला आहे, असे ठाणेदार यांनी म्हटले.

 

दरम्यान, अमेरिकन खासदार ठाणेदार यांनी काही काळापूर्वी इस्रायल-हमास युद्धात इस्रायलला पाठिंबा दिला होता. इस्रायलला अमेरिकेच्या पाठिंब्याची गरज असल्याचे ठाणेदार म्हणाले होते. तसेच हमास ही एक रानटी दहशतवादी संघटना असल्याचे सांगून त्याचा खात्मा करण्याची गरज आहे, अशी आशा ठाणेदार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे ठाणेदार हे पॅलेस्टाईन समर्थकांच्या निशाण्यावर आले असून, हा हल्लाही पॅलेस्टाईन समर्थकांनी केल्याचे मानले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR