36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयही माझी शेवटची निवडणूक

ही माझी शेवटची निवडणूक

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर मोठा निर्णय घेऊन त्यांनी सर्वांनाच चकित केले आहे. काँग्रेस नेते दिग्वजय सिंह म्हणाले की, ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात मध्य प्रदेशातील ९ जागांवर मतदान होत आहे. यापैकी राजगड या आपल्या बालेकिल्ल्यातून दिग्विजय सिंह निवडणूक लढवत आहेत.

माजी खासदार दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले. दरम्यान, यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी कारणही दिले आहे. दिग्विजय म्हणाले की, मी सध्या ७७ वर्षांचा आहे. पुढच्या निवडणुकीत मी ८२ वर्षांचा होईल. यामुळे मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, त्यामुळे नवीन लोकांना संधी देण्यात येईल, असेही दिग्विजय म्हणाले.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासमोर भाजपने रोडमल नगर यांना उमेदवारी दिली आहे. तर या जागेवर बहुजन समाज पक्षानेही आपला उमेदवार उभा केला आहे. बसपाने येथून डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली आहे. हा राजगड मतदारसंघ दिग्विजय सिंह यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र भाजपकडून त्यांना कडवी झुंज मिळणार आहे. यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR