27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ओहायो राज्यात एका २६ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या गाडीत विद्यार्थी जखमी अवस्थेत आढळून आला. मेडिकल युनिव्हर्सिटीने ही घटना दु:खद आणि संवेदनाहीन असल्याचे म्हटले आहे. आदित्य अदलखा हा सिनसिनाटी मेडिकल सेंटर विद्यापीठातील आण्विक आणि विकासात्मक जीवशास्त्र कार्यक्रमात चौथ्या वर्षाचा डॉक्टरेट विद्यार्थी होता. सिनसिनाटी पोलिसांनी एका कारमध्ये जखमी झालेल्या तरुणाचा शोध घेतल्याची माहिती दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांना गोळ्यांच्या खुणा असलेल्या कारची आणि आतमध्ये एक व्यक्ती जखमी अवस्थेत असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी अडलखा यांना रुग्णालयात नेले, जिथे दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अदलाखा उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तर भारतातून सिनसिनाटी येथे आले होते. त्यांनी २०१८ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून जीवशास्त्रात पदवी प्राप्त केली. अदलाखा यांनी २०२० मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली येथून फिजिओलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR