महागाई, बेरोजगारी हेच निवडणुकीचे मुद्दे

मुंबई : देशासमोर आज जे प्रश्न आहेत, संविधानासमोर जे संकट आहे, हुकूमशाहीचे सावट आहे, त्यामुळे आम्ही स्वत: इंडिया आघाडीसाठी प्रसंगी दोन पावले मागे घेऊन सामोपचाराने जागावाटपाचा निर्णय घेतला. आता याप्रकरणी कार्यकर्त्यांची नाराजी असली तरी ती दूर होईल. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, तर उत्तर मुंबईतील वातावरण पाहता महाविकास आघाडी तिथे विजयी होईल, असे सध्याचे चित्र आहे.

मूलभूत मुद्यांवर मुंबईतील निवडणूक लढविली जाईल. महागाई, बेरोजगारी आणि गरीब विरुद्ध भाजपचे निवडक उद्योजक आणि भांडवलशाही मानसिकता याविरोधात हा लढा असेल. जेव्हा उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणतात, झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन मिठागरांच्या जमिनीवर करणार, तेव्हा मुंबईतून गरिबांना हद्दपार करण्याची भाजपची भूमिका स्पष्ट दिसते आहे. हे मुंबईतील लोकांना पटणारे नाही, त्यामुळे भाजपचा मुंबईत निभाव लागणार नाही.

भाजप-शिंदे-अजित पवार सरकारने मुंबई महापालिकेला लुटून खाल्ले. देशातील सर्वांत श्रीमंत महापालिकेवर या सरकारने सव्वादोन लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. मुंबईतील मोक्याच्या जागा उद्योगपतींच्या घशात घालत आहेत. धारावीतील लाखो कोटींची जागा अदानी समूहाला दिली आणि इथल्या लोकांना बाहेर काढण्याचा या सरकारचा डाव आहे. नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखविले, पण आता पूर्वीचे दिवस बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपने दोन पक्ष फोडले. ईडीच्या भीतीने किंवा स्वार्थापोटी काही नेते गेले असतील पण कार्यकर्ता काँग्रेससोबतच आहे. त्यामुळेच राहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरील रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. निवडणूक रोख्यांतून मोदींनी जगातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारविरोधातील वातावरण पाहता मुंबई, ठाण्यातील सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे.

अदानी समूहाला अवघ्या आठ हजार कोटींत जागा दिली. मुंबईतील अशा इतर मोक्याच्या जमिनीही निवडक उद्योगांच्या हाती दिल्या जात आहेत, हे मुंबईतील जनता खपवून घेणार नाही. भाजपला गरिबी नव्हे, तर गरिबांनाच हटवायचे आहे, त्याला आम्ही चोख उत्तर देऊ. आज महागाई वाढली आहे. २०१४ मध्ये पिठाचा भाव ३० रुपये किलो होता, तो आता ६० झाला आहे. पेट्रोल, डिझेल, डाळी, भाजीपाला सगळे महागले आहे. २०१४ मध्ये ४०० रुपयांचा असलेला गॅस सिलिंडर १,१०० रुपयांना झाला आहे. डॉलर ८३ रुपयांवर गेला आहे. महागाईमुळे आज लोकांच्या जेवणातील भाजी गायब झाली आहे. आम्ही याच मुद्यांवर निवडणूक लढवणार आहोत. महागाईचा भाजपला निश्चितच फटका बसेल.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news