नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ७ कोटी खातेधारांसाठी आनंदवार्ता आणली आहे. ईपीएफओ उद्यापासून कर्मचा-यांच्या भविष्य निधी खात्यात व्याजाची रक्कम जमा करणार आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्र सरकारने ८.२५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. माहितीनुसार, पुढील १५ दिवसांच्या आता कोट्यवधी सदस्यांच्या सक्रिय खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे. कर्मचा-यांना हा मोठा दिलासा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पीएफ खात्यात व्याजाची रक्कम येण्याची प्रतिक्षा होती.
व्याज जमा झाल्यानंतर खातेदार ईपीएफ पासबुकमध्ये वाढलेली रक्कम तपासू शकतात. मोदी सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदर देण्याचे ठरवले. वित्त मंत्रालयाने ईपीएफओने निश्चित केलेल्या ८.२५ टक्के व्याजदराला मंजूरी दिली. आता उद्यापासून ईपीएफओ सदस्यांच्या बँक खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे.
















