संसदेत दोन तृतीयांश बहुमतासाठी डावपेच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपचे रणनीतीकार राजकीय चित्र बदलण्यासाठी ‘मिशन ३६०’ मध्ये गुंतले आहेत. १७ एप्रिल रोजी महिला आरक्षण व परिसीमनाशी संबंधित विधेयकावर लोकसभेत धक्का बसल्यानंतर भाजपने संसदेत २ तृतीयांश बहुमताची रणनीती आखली आहे. पक्षाचे लक्ष्य केवळ याच विधेयकापुरते मर्यादित नसून ‘एक देश-एक निवडणूक’ आणि न्यायालयीन सुधारणांसारख्या मोठ्या घटनात्मक बदलांसाठी आवश्यक ‘सुपर मेजॉरिटी’ मिळवण्यावर आहे. यासाठी विरोधी पक्षांत फूट, नवीन मित्रपक्ष जोडणे, गरज पडल्यास मतदानावेळी विरोधकांची गैरहजेरी यांसारख्या पर्यायांवर भाजपचे लक्ष आहे.

अलीकडेच तृणमूलच्या २० खासदारांचा एनडीएला पाठिंबा आणि शिवसेना ठाकरेंच्या ६ खासदारांचा शिंदे गटात प्रवेशानंतर या शक्यतेला अधिक बळ मिळाले. तरीही दोन तृतीयांश बहुमतासाठी आणखी ४१ खासदारांची गरज आहे. यासाठी भाजपची नजर आता सपा, द्रमुक, राष्ट्रवादी (शरद पवार) अशा पक्षांवर आहे. घटनादुरुस्तीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. महिला आरक्षण असो, परिसीमन असो किंवा इतर कोणतेही विधेयक. संविधानानुसार २०२६ मध्ये परिसीमन करायचे आहे. यासाठी सरकारने यापूर्वीच ८८८ लोकसभा आणि ३८४ राज्यसभा खासदारांच्या बसण्याच्या क्षमतेची संसद इमारत बांधली आहे.

परिसीमन झाले नाही तर ते पुढे ढकलण्यासाठी संविधानात दुरुस्ती करावी लागेल. असे केल्यास सरकारचे अपयश दिसेल. परिसीमन व्हावे आणि विरोधही होऊ नये, यासाठीच महिला आरक्षणाचा उपाय काढण्यात आला आहे. महिलांना एक तृतीयांश आरक्षण दिल्याने लोकसभेच्या जागा वाढतील. त्याच्या आडून परिसीमनालाही कायदेशीर मान्यता मिळेल. एक देश एक निवडणुकीसाठीही दोन तृतीयांश बहुमताची गरज भासू शकते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
04:50:10
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
00:00
Video thumbnail
Latur Traffic Issue|रस्ते बंद करूनही कोंडी कायम? लातूरच्या ट्रॅफिकचा प्रश्न ऐरणीवर
03:00
Video thumbnail
IAS Rahul Kulkarni|लातूर मनपाला अखेर नवे आयुक्त; राहुल कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार!
02:04
Video thumbnail
Solapur|दुधनी बाजार समितीत चबुतरा वाद पेटला; ५ तासांच्या आंदोलनानंतर प्रशासनाची माघार
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अनधिकृत बॅनर्सविरोधात धडक मोहीम; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश
03:07
Video thumbnail
लोकनेते विलासराव देशमुख यांचा विकासाचा वारसा; लातूरला विभागीय आयुक्तालयाची गरज – आ. अभिमन्यू पवार
01:47
Video thumbnail
LIVE- विधान परिषद पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
02:24:19
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन थेट प्रक्षेपण
01:56:55
Video thumbnail
Nanded|"हिंमत असेल तर समोर या!" नागेश पाटील आष्टीकरांचा विरोधकांना इशारा
04:03
Video thumbnail
Latur|लातूर सिटी बसची पोलखोल! तपासणीत धक्कादायक त्रुटी
03:51
Video thumbnail
Latur|फिल्मी स्टाईल पाठलागानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
02:19
Video thumbnail
Latur|जून संपला... पण पाऊस नाही! लातूरचा शेतकरी चिंतेत
05:24
Video thumbnail
HSRP NUMBER PLEAT|HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर RTOची कारवाई सुरू
04:51
Video thumbnail
Breaking News|नांदेडमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यासमोर काळे झेंडे; राजकीय वातावरण तापले!
01:26

Latest news