नवी दिल्ली : इंडियन फार्माकोपिया कमिशनने (आयपीसी) आरोग्य सेवा कर्मचारी आणि रुग्णांना पेनकिलर मेफ्टलच्याबाबतीत इशारा दिला आहे. मेफ्टलच्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवण्यास आयपीसी सांगितले आहे. हे सामान्यतः मासिक पाळीच्या वेदना आणि संधिवातमध्ये याचा वापर केला जातो. आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाच्या ( पीव्हीपीआय) विश्लेषणामध्ये, औषधाचे प्राथमिक दुष्परिणाम इओसिनोफिलिया आणि सिस्टेमिक सिंड्रोम आढळले आहेत.
जारी करण्यात आलेल्या अलर्टमध्ये आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांना औषधाच्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आणि त्यांना याची माहिती मिळाल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक- १८००-१८०-३०२४ वर कॉल करावा, ते आवाहन करण्यात आले आहे.