वैष्णोदेवी मंदिरातील २० टन चांदी खोटी?

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता जम्मू-कश्मिरमधील माता वैष्णोदेवी मंदिरातील चांदीच्या अर्पणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सुमारे ५५० कोटी रुपयांच्या चांदीपैकी तब्बल ९५ टक्के धातू बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जम्मूच्या मुख्य न्यायिक दंडाधिका-यांच्या न्यायालयाने जम्मू-काश्मीर गुन्हे शाखेला (क्राईम ब्रांच) संबंधित सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मे महिन्यात श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने मंदिरात जमा झालेली सुमारे २० टन चांदी वितळवण्यासाठी आणि सुरक्षित साठवणुकीसाठी सरकारी टांकसाळीत पाठवली होती. या चांदीची अंदाजे किंमत ५५० कोटी रुपये होती. मात्र, धातूची तपासणी करताना धक्कादायक बाब समोर आली. पाठवण्यात आलेल्या चांदीपैकी केवळ ५ टक्केच शुद्ध चांदी असल्याचे निष्पन्न झाले, तर उर्वरित धातूमध्ये कॅडमियम आणि लोखंडाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळल्याचे सांगण्यात आले आहे.

सुरुवातीला भाविकांनी नकळत बनावट चांदी अर्पण केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अ‍ॅडव्होकेट दीपक शर्मा यांनी हा दावा फेटाळून लावत मंदिरात अर्पण झालेल्या ख-या चांदीची अदलाबदल करून तिचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ९ मे रोजी जम्मू-कश्मिर गुन्हे शाखेच्या महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करून गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, अपहार आणि सरकारी नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणी एफआयआर दाखल करून सखोल तपास करण्याची मागणी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26

Latest news