पाक संघ भारतात येताना ड्रग्ज आणायचा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक तणावादरम्यान आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि क्रीडा जगताला हादरवून सोडणारा खळबळजनक दावा समोर आला आहे. भारताच्या गृह मंत्रालयाचे माजी अंडर सेक्रेटरी आरव्हीएस मणी यांनी थेट पाकिस्तानी क्रिकेट संघालाच ड्रग्ज तस्कर घोषित केले आहे.

शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ यांसारखे स्टार क्रिकेटपटू जेव्हा जेव्हा भारत दौ-यावर यायचे, तेव्हा ते स्वत:सोबत ड्रग्जचा मोठा साठा घेऊन यायचे आणि या संपूर्ण काळ्या धंद्यामागे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा हात होता, असा खळबळजनक आरोप मणी यांनी केला आहे.

आरव्हीएस मणी हे २००६ ते २०१० या काळात गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागात कार्यरत होते आणि  त्यांच्याकडे जम्मू-काश्मीरसह दहशतवादाशी संबंधित अत्यंत संवेदनशील फाईल्सची जबाबदारी होती.

शोएब अख्तर आणि आसिफची हाय कमिशनरसमोर कबुली
मंत्रालयातील आपल्या कार्यकाळातील एका गुप्त अहवालाचा हवाला देत आरव्हीएस मणी म्हणाले, क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ यांनी स्वत: पाकिस्तानी हाय कमिशनरसमोर कबुली दिली होती की ते भारतात ड्रग्ज घेऊन आले आहेत. हा प्रकार उघड होताच त्यांना तातडीने मायदेशी रवाना करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानची कोणतीही टीम किंवा डेलिगेशन भारतात येत असे, तेव्हा ते वैयक्तिक वापरासाठी नाही तर व्यावसायिक हेतूने ड्रग्जची तस्करी करायचे. ही घटना घडल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत म्हणजेच मार्च २००७ मध्ये वेस्ट इंडिजमधील वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचे इंग्लिश प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद मृत्यू झाला. वूल्मर हे पाकिस्तानी खेळाडूंच्या या ड्रग्ज नेटवर्कचा तीव्र विरोध करत होते, म्हणूनच त्यांची कट रचून हत्या करण्यात आली, असा संशय मणी यांनी व्यक्त केला आहे.

भारतातील दहशतवादी हल्ल्यांचे कनेक्शन
मणी यांनी थेट सांगितले की, भारतात ड्रग्ज पाठवणे ही पाकिस्तानची अधिकृत सरकारी नीती आहे. तत्कालीन संरक्षण गुप्तहेर संस्थेच्या अहवालानुसार, भारतात होणा-या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ३० टक्के हल्ल्यांचा पैसा हा याच ड्रग्जच्या काळ्या बाजारातून गोळा केला जायचा.

मंत्रालयातील अंतर्गत गणिते
मणी यांनी सुरक्षा यंत्रणांच्या कामाचे गुपित सांगताना म्हटले आम्ही गृह मंत्रालयात असताना एक वेगळेच गणित मांडायचो. जर अफगाणिस्तानच्या जलालाबाद प्रांतात अफीमचे पीक प्रचंड आले, तर आम्ही सतर्क व्हायचो; कारण त्याचा थेट अर्थ असा असायचा की आता भारतात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढणार आहे. तिथल्या पिकावरून आम्ही भारतातील धोक्याचा अंदाज लावायचो.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news