दोहा : हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळापासून संघर्ष सुरु होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी हमाससोबतच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. करारानंतर दोन्ही बाजूंनी युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. अखेर इस्रायल आणि हमासची युद्धविरामावर सहमती बनली आहे.
एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, सुटका झालेल्यांमध्ये चार वर्षांच्या मुलीसह तीन अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) पर्यंत कराराची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. हमासने दावा केला आहे की इस्रायल इस्रायलच्या तुरुंगातून १५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल, ज्यामध्ये सर्व महिला आणि लहान मुले असतील. यासोबतच रोज शेकडो ट्रक इजिप्तसोबतच्या रफाह सीमा ओलांडू शकतील. हे गाझामधील पॅलेस्टिनींना मानवतावादी पुरवठा करेल.
कतारने म्हटले आहे की, येत्या २४ तासांत युद्धबंदीची वेळ जाहीर करण्यात येईल. हे युद्धविराम चार दिवसांसाठी लागू असेल आणि ‘ते आणखी वाढू शकते’ असेही सांगण्यात आले आहे. हमासने बंदी बनवलेल्या इस्रायली ओलीसांच्या संदर्भात बहुप्रतिक्षित करार झाला आहे. या करारांतर्गत मानवतावादी मदत, अत्यावश्यक औषधे आणि इंधनाने भरलेले शेकडो ट्रक गाझामध्ये दाखल होतील.चार दिवसांच्या युद्धबंदीदरम्यान इस्रायल कोणताही हल्ले करणार नाही किंवा कोणालाही अटक करणार नाही, असे हमासच्या निवेदनात म्हटले आहे.
चार दिवसांच्या युद्धबंदीदरम्यान इस्रायल कोणतेही हल्ले करणार नाही किंवा कोणालाही अटक करणार नाही, असे हमासच्या निवेदनात म्हटले आहे. चार दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविराम दरम्यान, स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०४:०० पर्यंत दक्षिण गाझा आणि उत्तर गाझामध्ये दररोज सहा तास हवाई वाहतूक पूर्णपणे बंद असेल. गाझाच्या हवाई क्षेत्रावर इस्रायलचे नियंत्रण आहे.
७ हजार पॅलेस्टिनी इस्रायलच्या ताब्यात
ह्युमन राइट्स वॉचने सांगितले की, सध्या सुमारे ७ हजार पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलच्या ताब्यात आहेत. यामध्ये २०० महिला आणि ६० मुले आहेत. किरकोळ प्रकरणात इस्रायलने पॅलेस्टिनी मुलांना ताब्यात घेतले आहे.
५० ओलिसांची सुटका तर १५० पॅलेस्टिनींची मुक्तता
इस्रायल आणि हमसमध्ये झालेल्या करारानुसार, सुरुवातीच्या टप्प्यात, हमास चार दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाच्या बदल्यात महिला आणि मुलांसह ५० ओलिसांची सुटका केली जाईल. ५० इस्रायली ओलीसांच्या बदल्यात इस्रायली तुरुंगात असलेल्या १५० पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची मुक्तता केली जाणार आहे. याशिवाय, सुटका करण्यात आलेल्या प्रत्येक अतिरिक्त १० ओलिसांसाठी युद्धविरामाचा अतिरिक्त दिवस असेल, असेही या करारात म्हटले आहे. वृत्तानुसार, इस्रायल ३०० पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करू शकतो.