28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयगाझासाठी इस्रायलने दिलेली शिथिलता पुरेशी नाही : अमेरिका

गाझासाठी इस्रायलने दिलेली शिथिलता पुरेशी नाही : अमेरिका

संयुक्त राष्ट्र : हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीला दिली जाणारी मदत थांबवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून हमास आणि इस्रायलमधील संघर्ष सुरूच आहे. अपुऱ्या इंधनामुळे गाझामध्ये मोठे संकट उभे टाकले होते. अनेक रुग्णालये बंद पडली होती आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. यात नवजात बालकांचाही समावेश आहे. इस्रायलवर जगभरातून नाकाबंदी उठवण्यासाठी दबाव वाढतच आहे. यामुळे इस्रायलने गाझामध्ये दररोज दोन टँकर तेल नेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, गाझासाठी इस्रायलने दिलेली शिथिलता पुरेशी नाही, असे अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

इस्रायलने गाझामध्ये इंधनाच्या प्रवाहावर घातलेली बंदी शिथिल करणे पुरेसे नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रपती कार्यालय आणि संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. गाझामधील मानवतावादी संकट लक्षात घेता हे पुरेसे नाही, असे व्हाईट हाऊस आणि संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्यास मदत करत असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. पाण्याचे पंप, सांडपाणी व्यवस्था आणि दळणवळण यंत्रणा सुरळीत करायची आहे, असे इस्रायलने म्हटले आहे.

इस्रायलच्या हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू
गाझातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी सांगितले की, गाझामधील मोबाईल फोन नेटवर्क अंशतः पूर्ववत करण्यात आले आहे. दरम्यान, इस्रायलकडून गाझावर बॉम्बफेक सुरूच आहे. पॅलेस्टिनी न्यूज एजन्सीने शनिवारी वृत्त दिले आहे की, इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे २६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

अल शिफा रिकामे करण्याचे आदेश
गाझामधील सर्वात मोठे रुग्णालय अल शिफा येथून मिळालेल्या वृत्तानुसार इस्रायली लष्कराने अल शिफा रुग्णालय रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. वृत्तसंस्थेने पॅलेस्टिनी डॉक्टरांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सैनिक हॉस्पिटलच्या परिसरात झडती घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR