37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसंत श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनाचे सौभाग्य मोठे

संत श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनाचे सौभाग्य मोठे

आळंदी : संत श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेणे हे माझं सौभाग्य असल्याचे सांगत धीरेंद्र कृष्णशास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी आळंदीत माउलींच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर मत व्यक्त केले. आळंदी येथे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला धीरेंद्र कृष्णशास्त्री महाराज यांनी गुरुवारी हजेरी लावली. त्यांनी प्रथम संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गीता महोत्सवात त्यांनी स्वामी राजेंद्रदास महाराज यांचे गीता कथनाचे श्रवण केले.

या वेळी शास्त्री यांनी सांगितले की, माझे सौभाग्य आहे, भगवंताची कृपा प्राप्त झाली आहे, प्रथम सौभाग्य हे की आळंदी तीर्थक्षेत्रात संत श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले. दुसरे सौभाग्य कथा श्रवणाचा मिळाला. तिसरे सौभाग्य भारत देशात लाखो-करोडो महापुरुष आहेत. त्यापैकी संतांचे सूर्यमोर्य जे व्यासपीठावर आहेत ते आमच्या दृष्टीने मलूक पीठाचे महाराज. वास्तविक रूपामध्ये त्या परंपरेचे पालन करणारे, वास्तविक रूपात इतके ममत्व, स्रेह संतांवर देत असलेले आणि संतांविषयी अगाध श्रद्धा आहे. राष्ट्रभक्ती संमेलनानंतर आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी योगदान देणा-या विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या उत्सवाची सांगता पूज्य ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांच्या दिव्य संगीतमय कीर्तनसंध्येने झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR