31.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगसुरक्षा संशोधकाने २.५ मिलीयन डॉलर्सला लुटले; मात्र ‘अ‍ॅपल’ने केले त्याचे कौतुक

सुरक्षा संशोधकाने २.५ मिलीयन डॉलर्सला लुटले; मात्र ‘अ‍ॅपल’ने केले त्याचे कौतुक

वॉशिंग्टन : एका सुरक्षा संशोधकाने ‘अ‍ॅपल’ कंपनीला २.५ मिलीयन डॉलर्सला लुटले, त्याचा सुगावा देखील या कंपनीला लागू शकला नाही. मात्र या सुरक्षा संशोधकाच्या चांगल्या कामाचे कौतुक अगदी ऍपल कंपनीने देखील केले. अखेर त्याची चोरी उघडकीस आली आणि पोलिसांनी संशोधकाला अटक केली.

नोआह रॉस्किन-फ्राझी असे या संशोधकाचे नाव आहे. तो ‘झीरोक्लिक्स लॅब’ या कंपनीसोबत काम करत होता. मोठमोठ्या कंपन्या आपल्या सुरक्षा व्यवस्थेतीत त्रुटी शोधण्यासाठी अशा संशोधकांना काम देतात. आपल्या कामासाठी नोआह सर्वत्र प्रसिद्ध होता. त्यामुळेच ऍपल कंपनीने देखील त्याला काम दिले होते.

विशेष म्हणजे, चांगले काम केल्याबद्दल ऍपल कंपनीने त्याला एक ई-मेल देखील लिहिला होता. ‘नोआह आणि प्रो. जे (झीरोक्लिक्स एआय लॅब) या दोघांनी आमची भरपूर मदत केली’ अशा आशयाचा हा मेल होता. मात्र, हा मेल येण्याच्या दोन आठवड्यापूर्वीच नोआहला अटक करण्यात आली.

ऍपलच्या टूलबॉक्सच्या बॅकएंड सिस्टीममध्ये नोआहला एक त्रुटी सापडली होती. याची माहिती त्याने कीथ लॅटेरी नावाच्या आणखी एका संशोधकाला दिली. त्यानंतर या दोघांनी मिळून कंपनीच्या बॅकएंडवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले केले. काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्यांना टूलबॉक्सचा ऍक्सेस मिळाला.

यानंतर त्यांनी ऍपलच्या कस्टमर सपोर्टसोबत काम करणा-या एका थर्ड पार्टी कंपनीच्या कर्मचा-याचे अकाउंट हॅक केले. या अकाउंटची मदत घेऊन, खोट्या प्रोफाईल्सच्या मदतीने या दोघांनी विविध प्रकारचे ऍपल प्रोडक्ट्स मागवले. प्रत्येक वेळी प्रोडक्ट मागवताना ते टूलबॉक्सच्या मदतीने वस्तूंचे टोटल बिल शून्य रुपये करत होते. त्यांनी सुमारे २.५ मिलियन डॉलर्स किंमतीचे आयफोन, मॅक आणि गिफ्ट कार्ड्स मागवले.

अशी पकडली चोरी
या दोघांपैकी एकाने ऍपल केअरचे चोरलेले सबस्क्रिप्शन हे स्वत:पुरते मर्यादित ठेवले नाही. त्याने हे सबस्क्रिप्शन आपल्या स्वत:च्या अकाउंटशी आणि कुटुंबीयांच्या अकाउंटशी देखील लिंक केले. यामुळे ही चोरी पकडली गेली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR