30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeधाराशिवरात्र वै-याची, जागे राहा.....

रात्र वै-याची, जागे राहा…..

कळंब : सतीश टोणगे
मतदानाच्या आदल्या दिवशी, रात्र वै-याची आहे जागे राहा…..असे नेते गण सांगून जायचे, मग काय जिथे मतपेट्या ठेवलेल्या असतील तिथे, रातभर पहारा करण्या साठी कार्यकर्ते बॅटरी घेऊन सज्ज असायचे…..रात्री उशिरा कोणाची गाडी, कोणाच्या दारा समोर थांबते, त्या तून कोण उतरते हे पाहण्या साठी गावातील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते जागते राहो.. चा नारा देत असत…या मुळे आपल्या नेत्यावरील निष्ठा दिसून यायची. आता सगळेच बदलले आहे.

रात्रीतून पक्ष बदलले जात आहेत. सकाळी एका पक्षाच्या गाडीत बसलेला कार्यकर्ता संध्याकाळी दुस-याच पक्षाचा गमजा गळ्यात घालून फिरताना दिसत आहे. निवडणुकीच्या पहिल्या रात्रीच मोठ्या घडामोडी होतात, अंधा-या रात्रीच गाव विकत घेण्याची किमया, उमेदवार करतात. मग जुनी जाणती मंडळी मात्र, हताश होऊन, रात्री माझं गाव विकताना पाहिलं…अस कधी अगोदर घडले नाही, कुठे हजारात, कुठे पाचशेत बरबाद होताना पाहिल्याची चर्चा ज्येष्ठ मंडळींनी करताना दिसतात.

मशीन ऐवजी मत पत्रिका होत्या, त्यावेळी काही प्रकार होऊ नये यासाठी पाळत ठेवली जायची….आता मात्र मशीनच बदलले जात आहेत, याची राखण तरी कशी करायची असा प्रश्न विचारला जात आहे…..रात्र वै-याची आहे, सावध राहा, या आदेशाने कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून फिरताना दिसायचे, आता हे चित्र बदलले आहे. निष्ठा, आदर्श व्यक्ती कुणी राहिले नाहीत…त्या मुळे कुणावर पाळत ठेवण्याची ही गरज नाही…..पैशा पुढे स्वत:चा स्वाभिमान विकला जात आहे, या सोबतच मतदान हे पवित्र दानही हजार रुपयात विकले जात आसल्याची कुजबूज ज्येष्ठ नागरिक करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR