35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरप्रचाराचा थांबला जोर, मतदाराच्या हाती दोर...

प्रचाराचा थांबला जोर, मतदाराच्या हाती दोर…

कंधार : सय्यद हबीब

स्टार प्रचारकांच्या धडाडणा-या तोफा, फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या पदयात्रा, मोटारसायकल रॅली अन् सभांच्या माध्यमातून उमेदवारांनी प्रचाराचा सुपर संडे केला. सायंकाळी प्रचार समाप्ती झाली. आता निवडणुकीचे दोर मतदारांच्या हाती आले असून, आज उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतदान यंत्रामध्ये बंदिस्त होणार आहे.

लातूर लोकसभेची यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे या दोन प्रमुख उमदेवारांमध्ये लढत होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी नागरिकांनी अनुभवली. राज्य व देशपातळीवरील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा, रॅलींनी निवडणुकीत रंग भरला.

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.विकासाच्या मुद्यांवर तसेच व्यक्तिगत पातळीवरील आरोपांनी ही निवडणूक गाजली आता धडाडणा-या तोफा रविवारी रात्रीपासून शांत झाल्या.

प्रचार समाप्तीनंतरही अनेक उमेदवारांकडून रात्री छुप्या प्रचाराला सुरुवात झाल्याचे दिसून आले. माजी नगरसेवक, पदाधिकारी, मंडळांचे पदाधिकारी अशा लोकांच्या गाठीभेटी अशाप्रकारच्या छुप्या घेण्याची लगबग सुरु होती. तसेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविवारी दिवसभर नागरिकांवर उमेदवारांच्या मतदान आवाहनाच्या कॉलचा भडिमार करण्यात आला. नागरिक यामुळे हैराण झाले होते. प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले असून तप्त होणार टक्केवारी वाढते का कमी होते हे पाहणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून विजेच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंत्रणा सज्ज
प्रचार समाप्तीनंतर आता सर्वांना मतदानाचे वेध लागले आहेत. प्रशासकीय यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे. लोहा विधानसभा मतदारसंघात ३३० मतदान केंद्र असून लोहा तालुक्यात १८३ तर कंधार मध्ये १४७ मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्राध्यक्ष ४००, मतदान अधिकारी -एक कर्मचारी -४२५, मतदान अधिकारी २ व ३ कर्मचारी ८२५ असे १ हजार ६७६ कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान केले जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR